पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापलिकेच्या वतीने आसूडगाव येथे रस्त्याचे डांबरीकरण, तर एसीसी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन वर्ग बांधण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 28) करण्यात आले.
पनवेल महापलिकेच्या वतीने विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आसूडगाव येथे रस्त्याचे डांबरीकरण आणि शाळेत तीन वर्ग बांधण्यात येणार आहे. या कामांच्या शुभारंभास भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मधे, शाळा व्यवस्थापक शशिकांत शेळके, माजी सरपंच सीताराम हुद्दार, मनोहर म्हात्रे, संजीत शेळके, एसीसी सिमेंट कंपनीचे श्यामकुमार गुप्ता, प्रत्यांशू पांड्या, हेमंत कापसे, श्री. महाडिक, हरिश्चंद्र म्हात्रे, विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कामांसंदर्भात सविस्तर माहिती दिली.