Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / रायगड पोलीस दल उपविजेते

रायगड पोलीस दल उपविजेते

अलिबाग : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग येथे झालेल्या 46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 87 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेत रायगडचे पुरुष 75, महिला 21 असे एकूण 96 स्पर्धक सहभागी झाले होते. रायगडने वैयक्तिक 43 सुवर्ण, 19 रौप्य, 14 कांस्य अशी एकूण 76 पदके जिंकली, तर सांघिक गटात पाच सुवर्ण , चार रौप्य, दोन कांस्य अशी एकूण 11 पदके मिळवली.  स्पर्धेमध्ये एकूण 87 पदके रायगड पोलीस दलातील खेळाडूंनी मिळवली.

रायगड पोलीस दलाचे संघ व्यवस्थापक म्हणून राखीव पोलीस उपनिरीक्षक जुन्नेद शेख यांनी जबाबदारी सांभाळली. रायगड पोलीस क्रीडाप्रमुख किशोर गजानन गुरव यांनी त्यांना सहकार्य केले.

पदकांची लयलूट करून उपविजेतेपद पटकाविल्याबद्दल रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी खेळाडू, व्यवस्थापक, क्रीडाप्रमुख यांचे अभिनंदन  केले व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp