Saturday , December 7 2019
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / तायक्वांदो स्पर्धेत सुर्वे बंधूंचे सुयश

तायक्वांदो स्पर्धेत सुर्वे बंधूंचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील घोसाळवाडी येथील ज्ञानेश्वर सुर्वे यांचे चिरंजीव यश व साई यांनी मुंबई येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुयश प्राप्त केले आहे.

टायगर तायक्वांदो अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित चॅम्पियनशिपमध्ये यश सुर्वे याने 13 वर्षांखालील 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले, तर साई सुर्वे याने पाच वर्षांखालील 15 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. दोन्ही खेळाडू हे प्रशिक्षक सचिन माळी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी …

Leave a Reply

Whatsapp