Saturday , December 7 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हायकल गेट बंद आंदोलन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हायकल गेट बंद आंदोलन

पनवेल : किरकोळ कारणावरून चुकीच्या पद्धतीने कामावरून निलंबित करण्यात आलेल्या कामगारांच्या हक्कासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता हायकल कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या हायकल कंपनीने क्षुल्लक कारणावरून चार स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर रूजू करावे यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दोन बैठकाही झाल्या, मात्र व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका कायम ठेवली. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेृत्वावाखाली गेट बंद आंदोलन केले जाणार आहे.

Check Also

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी …

Leave a Reply

Whatsapp