Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / विज्ञान प्रदर्शनात ‘सीकेटी’चा बोलबाला

विज्ञान प्रदर्शनात ‘सीकेटी’चा बोलबाला

विद्यालयाच्या प्रकल्पाचा प्रथम क्रमांक

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे विद्यालयाच्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे वांवजे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सीकेटी विद्यालयातील विद्यार्थी मनोज खकाळ व सहकारी विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रकल्प पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. याखेरिज प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवीतील तेजस काळे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्वांचे पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांनी कौतुक केले.

या यशाबद्दल मनोज व तेजस यांच्यासह मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp