Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / माणगावमध्ये महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन

माणगावमध्ये महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन

माणगाव : प्रतिनिधी

येथील डीजीटी महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 16) विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अ‍ॅड. कविता ढाकवळ यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे, आपण कायद्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो, कायद्याच्या वापरामुळे आपल्याला कशा प्रकारे संरक्षण मिळू शकते याविषयी अ‍ॅड. कविता ढाकवळ यांनी उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमास महिला विकास कक्षप्रमुख प्रा. संगीता उतेकर आणि सर्व प्राध्यापिका तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp