Friday , June 25 2021
Breaking News

रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीसाठी भाजप,  आरपीआय मित्रपक्ष युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात पहावयास मिळत आहे. शहरातील गावदेवी पाडा येथे रविवारी (दि. 29) सायंकाळी, तर सोमवारी (दि. 30) सकाळी लाईन आळी परिसरात लोंढे यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचार दौर्‍यांना मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले. या प्रचार दौर्‍यात भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेवक जगदिश गायकर, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, स्वाती कोळी, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, मंगेश पिलवळकर, तुषार कर्पे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp