Tuesday , May 11 2021
Breaking News

माणगावात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

माणगाव : प्रतिनिधी

कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 29) सायंकाळी लोणेरे येेथील सोनभैरव रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात गुरुवर्य पांडुरंगबुवा नांदवीकर व शाहीर कृष्णा शिवराम उतेकर यांना जीवन गौरव शाहीर कला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजनेते चंद्रकांत धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सन 2020च्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याची माहिती दिली. या सोहळ्याला मंडळाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश महाबळे, माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम, विठोबा टेंबे, नथुराम पाष्टे, उमाजी म्हस्के, सुधाकर टेंबे, महेंद्र तेटगुरे, राजेश पानावकर, महेंद्र टेंबे, लोणेरे सरपंच संगीत डवले, महादेव सुतार, राजाराम टेंबे, मनोज निर्मल, प्रकाश टेंबे, मुकेश टेंबे, राजेश  कासारे, शांताराम भोरावकर, मुकुंद जांभरे, टी. एस देशमुख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व लोणेरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात बैठकीच्या लावण्या, पोवाडे सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भात्रे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व …

Leave a Reply

Whatsapp