Friday , May 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / चिखले येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण

चिखले येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण

पनवेल : रामप्रहर वृत

तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून विविध विकासकामे सुरु आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

या वेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रमेश पाटील, सुरेखा पाटील, हिरामण पाटील, राम फडके, पांडुरंग पाटील, गोमा पाटील, अविनाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …

Leave a Reply

Whatsapp