Sunday , November 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेलच्या ज्येष्ठांना पुन्हा बस सवलत

पनवेलच्या ज्येष्ठांना पुन्हा बस सवलत

महापौर डॉ. कविता चौतमोल मांडणार ठराव

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ‘एनएमएमटी’चे सवलतीतील पास पुन्हा सुरू होणार आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या अनुदानाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे पनवेलच्यरा महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले आहे.
‘एनएमएमटी’ने सप्टेंबर 2018पासून बसमधून प्रवास करणार्‍या पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सवलतीचे पास बंद केले आहेत. 50 रुपयांमध्ये काढलेला पास दाखविल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकीटदरात एनएमएमटी बसमधून प्रवास करता येत होता. नवी मुंबई पालिका, कल्याण-डोंबिविली पालिका अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या पासचे अनुदान एनएमएमटी प्रशासनाला देत असल्याने पनवेल पालिकेनेही अनुदानाची रक्कम भरावी, अशी मागणी ‘एनएमएमटी’कडून करण्यात आली.
पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांची नुकतीच भेट घेऊन ही पास योजना सुरू करण्याविषयी चर्चा केली. अनुदान देण्याविषयी लवकरच पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव
घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पटलावर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी सवलतीचा विषय स्वत: महापौर डॉ. चौतमोल सभागृहासमोर ठेवणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक हिताच्या या ठरावाला सभागृहातील सत्ताधारी बाकांवर बसणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पाठिंबा देतील. या ठरावानंतर आर्थिक
तरतुदीसाठी प्रशासनाच्या मान्यतेनंतर तत्काळ ज्येष्ठ नागरिकांचे एनएमएमटी बससेवेचे सवलतीचे पास पुन्हा सुरू होतील.

Check Also

शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने …

Leave a Reply

Whatsapp