Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र -अतुल भारद्वाज

संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र -अतुल भारद्वाज

खोपोली : प्रतिनिधी

रा. स्व. संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र आहेत. संस्कारक्षम नागरिक तयार होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना बाल शाखेवर पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील भागवत कथाकार पूजनीय अतुल कृष्णाजी भारद्वाज यांनी शुक्रवारी (दि. 31) खोपोलीत केले. खोपोलीतील लोहाणा महाजन वाडी येथे जाखोटिया परिवाराच्या वतीने सात दिवसीय भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. कथा वाचक पूजनीय भारद्वाजजी यांचा संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांशी संपर्क आला. त्यांनी लगेच एक दिवस प्रभात शाखेवर येण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी  सकाळी ते खोपोलीतील विरेश्वर व्यवसायी शाखेवर आले होते.त्यावेळी त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या वेळी तालुका संघचालक राकेश जी. पाठक, कार्यवाह अविनाश मोरे यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रा. स्व. संघाचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे. समाजामध्ये ज्या गोष्टी सध्या सुरू आहेत, त्या परिस्थितीत समाज संघाकडे एका आश्वासक नजरेने पहात आहे. त्या दृष्टीने आपण आपले कार्य केले पाहिजे, असेही भारद्वाजजी यांनी सांगितले. नरसिंग तिवारी यांनी पद्य सांगितले. रोहित कुलकर्णी यांनी शाखेचे संचलन केले.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp