Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / …तर देश बदलला नसता!

…तर देश बदलला नसता!

पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर
देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवदेन केले. या वेळी त्यांनी तुम्ही चांगल्या चष्म्यातून पाहले तर तुम्हाला झालेली कामे दिसतील, असे टोलाही लगावला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून नव्या भारताचे चित्र मांडले आहे. त्यांचे भाषण सगळ्यांना दिशा आणि प्रेरणा देणारे आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करणार आहे, मात्र सरकारला सगळ्या कामांची इतकी घाई का आहे? सगळेच काम एकत्र का करीत आहेत? असा सूर विरोधकांमधून लावला जात आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या ‘नयी सुबह, नया सूरज आया है…’ या कवितेतून प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान म्हणाले, लोकांनी केवळ सरकार बदलले नाही, तर देशात बदल होण्याचीही अपेक्षा ठेवली. नव्या विचाराने काम करण्याची देशाची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्हाला इथे येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हीही तुमच्याच रस्त्याने चालत राहिलो असतो, तर 70 वर्षानंतरही कलम 370 हटवले गेले नसते. मुस्लिम महिलांना आजही तिहेरी तलाकची भीती वाटत राहिली असती. राम जन्मभूमीवरून वाद सुरूच असता. कतारपूर साहिब कॉरिडॉर झाला नसता. भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसता. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती झाली नसती. कामांचा वेग वाढला नसता, नव्हे तर ही कामे झालीच नसती. 37 कोटी लोकांची बँक खाती एका वेळी उघडली नसती. 13 कोटी घरांमध्ये गॅस मिळाला नसता. दोन कोटी गरिबांसाठी परवडणारी घरे तयार झाली नसती. 11 कोटी लोकांच्या घरी शैचालये उभी राहिली नसती, असे सांगत मोदींनी काँग्रेसला धारेवर धरले. आमचे सरकार वेगाने निर्णय घेत आहे. त्यामुळे देशाला आता निर्णयांसाठी आणखी वाट पहायची गरज नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचाही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले, काँग्रेसचा एक नेता म्हणाला की, ‘सहा महिन्यांत तरुण मोदींना दांड्यांनी मारणार.’ असे असले तरी मी सहा महिन्यांत सूर्यनमस्कार करून स्वतः दंडाप्रुफ करून घेईल, असे सांगत मोदींनी राहुल यांना टोला लगावला.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp