Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / जडेजाने मोडला धोनी, कपिल यांचा विक्रम

जडेजाने मोडला धोनी, कपिल यांचा विक्रम

ऑकलंड : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडेत भारतीय संघाचा 22 धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने मालिकादेखील 2-0ने गमावली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नसला, तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक शानदार खेळी केली आणि अखेरपर्यंत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव या दिग्गजांना मागे टाकले.

ऑकलंड येथे झालेल्या दुसर्‍या वनडेत जडेजाने सातव्या क्रमांकावर येत 73 चेंडूंत 55 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 49व्या षटकात तो बाद झाला, पण न्यूझीलंडला विजयासाठी त्याने झुंजविले.

जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सातवे अर्धशतक झळकावले. यासह भारताकडून या क्रमांकावर फलंदाजी करीत सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम जडेजाने स्वत:च्या नावावर केला. याआधी भारताकडून सातव्या क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम धोनी आणि कपिल देव यांच्या नावावर होता.

धोनी आणि कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर प्रत्येकी सहा अर्धशतके केली होती. जडेजाने या दोघांनाही मागे टाकत सातवे अर्धशतक केले. त्याने सहाव्या विकेटसाठी श्रेयस अय्यर सोबत 33, सातव्या विकेटसाठी शार्दुल ठाकूर सोबत 24, आठव्या विकेटसाठी नवदीप सैनीसह 76 धावांची आणि नवव्या विकेटसाठी चहलसोबत 22 धावांची भागिदारी केली.

सैनीही लढला रवींद्र जडेजासोबतच नवदीप सैनीनेही न्यूझीलंडला झुंज दिली. त्याने नवव्या क्रमांकावर खेळताना 45 धावांची खेळी केली. सैनीने हरभजन सिंगला मागे टाकले. भज्जीने नवव्या क्रमांकावर खेळताना 37 धावा केल्या होत्या. भारताकडून नवव्या स्थानावरून खेळताना मदन लाल यांनी सर्वाधिक 53 धावांची खेळी केलेली आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp