Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / ‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात

‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय वुहानमधील 650 भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चीन सरकारने केलेल्या मदतीसाठी पंतप्रधान मोदींनी आभार मानले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाशी मुकाबला करण्यास भारत सरकार चीनला सहकार्य करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp