Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / राष्ट्रीय पिंच्याक स्पर्धेत पालीतील अनुजला ‘सुवर्ण’

राष्ट्रीय पिंच्याक स्पर्धेत पालीतील अनुजला ‘सुवर्ण’

पाली : प्रतिनिधी

सिलॅट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसर्‍या ऑल इंडिया इंटरझोन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशीपमध्ये पाली येथील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा नुकतीच नाशिकमध्ये झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील 31 राज्यांतून 700 खेळाडू सहभागी झाले होते. यात अनुज सरनाईकने 75 ते 80 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत टॅन्डींग (फाईट) प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अनुजला प्रशिक्षक तथा भारतिय पिन्चॅक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अनुजचे अभिनंदन होत आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp