Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा

खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा

खोपोली : प्रतिनिधी

नेहमी नाटक करत असतो याच्या शाळेला लॉक लावा, असे धमकावत खालापूर तालुक्यातील खरसुंडी शाळेतील शिक्षक रमेश नामदेव देवरूखकर (वय37, रा. निळजे डोंबविली) यांना जातीवाचक शिविगाळ करून चार जणांनी शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहे. सोमवारी शाळा सुरू असताना चार अज्ञात इसमानी शाळेत येवून रमेशला शिविगाळ केली. व त्याला विद्यार्थ्यांसमोर व्हरांड्यात आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  अनुसूचित जातीजमातीचा आहे, हे माहिती असूनदेखील त्या चौघांनी आपला जाणीवपूर्वक अपमान करत जबर मारहाण केल्याची तक्रार रमेश याने दिल्यानंतर खालापूर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp