Wednesday , February 26 2020
Home / ई-पेपर / निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती; श्रीसदस्यांचा उपक्रम

निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती; श्रीसदस्यांचा उपक्रम

पेण : प्रतिनिधी

गणेश विसर्जनाच्यावेळी गोळा करण्यात आलेल्या निर्माल्यापासून आठशे किलो सेंद्रीय खताची निर्मिती करून, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पेणमधील श्री सदस्यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पेण तालुक्यातील पेण, वाशी, रावे, वाशी नाका, वरवणे, सापोली, धावटे, वडखळ, जिते, हनुमान पाडा, आंबिवली, दादर, शिर्की, भाल अशा सोळा बैठकांतील 1341 श्री सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात दीड दिवस, पाच दिवस व गौरी विसर्जनाच्या वेळी 27 टन निर्माल्य गोळा केले होते. मागील पाच महिने या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून आठशे किलो सेंद्रीय खत तयार करण्यात आले आहे. या सेंद्रीय खताचा वापर श्री सदस्यांनी  लागवड केलेल्या वृक्षासाठी करण्यात येणार आहे.

Check Also

माथेरानमधील पाणपोईचे नळ तोडल्याने पर्यटकांचे हाल

कर्जत : बातमीदार युनियन बँक ऑफ इंडियाच्या माथेरान शाखेने येथील नौरोजी उद्यान व छत्रपती शिवाजी …

Leave a Reply

Whatsapp