Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील; मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील; मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम

मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचीही भाजपच्या गोटात चर्चा होती, मात्र पक्षनेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती आहे. दरम्यान, मुंबई प्रदेशाध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही निवडींसंदर्भात भाजपने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अध्यक्षांनी मंगलप्रभात लोढा यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. ही नियुक्ती तत्काळ लागू असेल.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp