Wednesday , February 26 2020
Home / महत्वाच्या बातम्या / खोपोलीत एसटी बस आणि दुचाकीची ठोकर

खोपोलीत एसटी बस आणि दुचाकीची ठोकर

एकाचा जागीच मृत्यू

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खोपोली गाव ते शिळफाटा यादरम्यान महामार्गावर शुक्रवारी (दि. 14) दुपारी एसटी बस व दुचाकीची ठोकर झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अशोक पाटील आपल्या पत्नीसह अलिबागवरून मळवली (लोणावळा) येथे दुचाकी (एमएच-14, ईटी-4916)ने परतत होते. खोपोली आणि शिळफाटा यादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील दर्ग्याजवळ  खोपोली-पनवेल एसटी बस (एमएच-14, बीएफ-1840) आणि सदर दुचाकीची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात अशोक पाटील (वय 46) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी बचावल्या आहेत. अपघातात मृत्यू झालेले अशोक पाटील हे मूळचे  भुसावळ येथील रहिवासी असून सध्या ते नोकरीनिमित्त मळवली (लोणावळा) येथे वास्तव्यास होते. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

ललिता इनकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार …

Leave a Reply

Whatsapp