Thursday , April 2 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल मनपा कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाईची मागणी

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी
शहरातील उरण नाक्यावरील मच्छी मार्केटमध्ये महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर  कारवाई करण्याची मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेऊन केली.
पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचार्‍यांनी (दि. 23) शहरातील उरण नाक्यावर असलेल्या मच्छी मार्केटच्या बाहेर मासळी विक्री करण्यासाठी बसणार्‍यांवर कारवाई केली. या वेळी विक्रेत्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली. या मारहाण करणार्‍यांवर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असा प्रकार करण्यास कुणी धजावणार नाही  यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे यांनी मंगळवारी दुपारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेऊन चर्चा केली.
या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, तसेच तेथील विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील,  असे सांगितले.

महापालिका स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत असताना कुणी कर्मचार्‍यांना मारहाण करणे चुकीचे आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांना लोकप्रतिनिधी आपल्या सोबत असल्याची जाणीव होईल.
-परेश ठाकूर, सभागृह नेते,
पनवेल महानगरपालिका

Check Also

अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी …

Leave a Reply

Whatsapp