Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / आज स्व. जनार्दन भगत जयंती व जीवन गौरव पुरस्कार सोहळा

आज स्व. जनार्दन भगत जयंती व जीवन गौरव पुरस्कार सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब-कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय येथे होणार आहे. स्व. जनार्दन भगत यांच्या नावाने प्रथमच देण्यात येणार्‍या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्यात प्रा. एन. डी. पाटील यांना स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, तर रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यास संस्थेचे हितचिंतक, पालक, पदाधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp