Saturday , October 16 2021
Breaking News

शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

गोरगरीब-कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्वर्गीय जनार्दन भगत यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने बसविण्यात आली. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण शनिवारी (दि. 29) करण्यात आले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत आयोजित कार्यक्रमास स्व. जनार्दन भगत यांचे कुटूंबीय संजय भगत, अजय भगत, प्रकाश भगत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, सदस्य विजय घरत, अमृत भगत, अनंताशेठ ठाकूर, रतनशेठ भगत, जयवंत देशमुख, सीमा भगत, सुजाता भगत आदी उपस्थित होते.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp