Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / दोघा क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू

दोघा क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसने स्पेनमध्ये दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (एआयपीएस)ने दिलेल्या वृत्तानुसार जोस मारिया कॅनडेला आणि थॉमस डीएज वाल्डेस या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला.
जोस हे रेडिओ नॅशनल डी स्पेनसाठी काम करीत होते. ते 59 वर्षांचे होते, तर थॉमस 78 वर्षांचे होते. ते मोटरपॉइंट नेटवर्क एडिटर्सचे संचालक होते. त्यांनी 30 वर्ष स्पेनमधील एएस वृत्तपत्रात काम केले होते.
आरएनईने दिलेल्या माहितीनुसार जोस यांचे निधन करोना व्हायरसमुळे झाला. ते घरी मृतावस्थेत आढळले. त्यांची शुक्रवारी टेस्ट होणार होती, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा होता, असे त्यांचे मित्र आणि एआयपीएसचे सदस्य प्रिटो यांनी सांगितले.
याआधी स्पेनमध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. क्रीडा क्षेत्रात करोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. स्पेनमधील अ‍ॅथलिटको पोर्टाडा क्लबचा प्रशिक्षक फ्रासिस्को गार्सिया याला करोना व्हायरसची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फ्रासिस्कोचे वय फक्त 21 वर्ष होते. फ्रासिस्को कॅन्सरवरदेखील उपचार घेत होता. यात काळात त्याला कोरोनाची लागण झाली.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp