Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण

पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण

पाली ः प्रतिनिधी
पाली ग्रामपंचायत व येथील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन रविवारपासून (दि. 22) सलग तीन-चार दिवस शहरातील विविध भागांत जंतुनाशक फवारणी केली. कोरोनाचे वाढते संकट पाहता इतर कोणत्याही जीवाणूंचा संसर्ग लोकांना होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे, अ‍ॅड. नरेश शिंदे, अमित निंबाळकर तसेच कर्मचारी अविनाश शिंदे, किरण पालकर व सुरज भगत यांच्यासह श्रीकांत ठोंबरे, सतीश शिंदे व गणेश सावंत या सुजाण नागरिकांनी पाली गावात मोटरसायकलवर फिरून व एकएकटे जाऊन ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी केली. परिसरातील डास व इतर जीवजंतू नष्ट व्हावेत आणि परिसर स्वच्छ व्हावा हा यामागील उद्देश होता. या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp