Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / गुड न्यूज! रायगडातील कोरोना रुग्णाला डिस्चार्ज

गुड न्यूज! रायगडातील कोरोना रुग्णाला डिस्चार्ज

अलिबाग : जिमाका
कोरोना विषाणूबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
परदेशवारी करून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला सुरुवातीला मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या कोरोनाबाधित व्यक्तीवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बुधवारी (दि. 25) त्याचे सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आले. म्हणून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, तर एका कोरोनाबाधित व्यक्तीवर कस्तुरबा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात अजूनही उपचार सुरू असून ती व्यक्ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे.
यादरम्यान एक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गित व्यक्तींची संख्या ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे घरी राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

Check Also

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कळंबोलीतील वाहनचालकांना अन्नवाटप

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतातदेखील …

Leave a Reply

Whatsapp