Wednesday , April 1 2020
Home / महत्वाच्या बातम्या / वर्तमानपत्रांची विक्री होणार पूर्ववत?

वर्तमानपत्रांची विक्री होणार पूर्ववत?

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांची विक्री बंद झाली आहे, पण आता पुन्हा वाचकांच्या हातात वर्तमानपत्र मिळणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र विक्री पुन्हा सुरू होणार असून, मुंबईत झालेल्या बैठकीत
यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तपत्रसेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
वर्तमानपत्र हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. रोज सकाळी वर्तमानपत्र हाती घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही, पण सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेला लॉकडाऊन आणि वर्तमानपत्रातून कोरोना व्हायरस पसरण्याची उठलेली अफवा यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात विक्री बंद होती, परंतु हा प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबईत मंत्री सुभाष देसाई आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात 1 एप्रिलपासून पुन्हा वर्तमापत्र विक्री सुरू करण्यावर निर्णय झाला. त्यामुळे आता मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रात इतर ठिकाणीही वर्तमानपत्र विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.
पेपरमधून व्हायरस पसरत नाही!
वर्तमानपत्राद्वारेही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे वर्तमानपत्र विक्रेत्यांनी विक्रीला नकार दिला, पण यासंदर्भात गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे.

Check Also

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध …

Leave a Reply

Whatsapp