Saturday , October 16 2021
Breaking News

भाजपच्या शेखर तांडेल यांच्याकडून मदत

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे  युवा नेते  तथा नवघरचे माजी सरपंच शेखर प्रकाश तांडेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 30)  नवघर गावाजवळील झोपडपट्टीत धान्य वाटप करण्यात आले.  या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नागरी  संवक्षण दलाचे सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हात्रे यांच्या उपस्थीतीत धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. एक हजार किलो धान्य वाटपाचा संकल्प केला, असून नवघर एसटी स्टॅन्डजवळील झोपडपट्टी मधील गरजू कुटूबांना 450 किलो धान्य वाटप तसेच उर्वरित 550 किलो धान्य नवघर परिसरातील असणार्‍या निराधार झोपडपट्टी वाशीयांना वाटण्यात आले, असे युवा नेते शेखर प्रकाश तांडेल यांनी सांगितले. धान्य वाटप करण्यासाठी नवघर गावातील युवा कार्यकर्ते, नेते ग्रामपंचायत सदस्य गणेश रमाकांत वाजेकर, ग्रामपंचायत सदस्य समाधान भोईर, नवघरचे माजी अध्यक्ष योगेश तांडेल जयप्रकाश भोईर, मंगेश भोईर, रुपेश भोईर यांच्या सहित नवघर युवा कार्यकर्ते प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जाऊन आपूलकीने विचारपूस करून आदराने धान्य वाटप केले.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp