Saturday , October 16 2021
Breaking News

अन्नदान पुरवठा मदत केंद्राचा 2300 लोकांनी घेतला लाभ

उरण : प्रतिनिधी

उरणमध्ये तहसीलदारांच्या अधिपत्याखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्रात सोमवारी मजूर, झोपडपट्टीवासीय गरीब गरजू आणि गावाकडे निघालेल्या अशा सुमारे 2300 लोकांना 2500 क्विंटल धान्य वाटप करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  उरणमध्ये तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp