Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य

मोहोपाडा : प्रतिनिधी

कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. यातच गोरगरिब गरजुंना मदत तसेच बेरोजगारांना व तूरूंगातील कैद्यांसाठी बंदीशाला तसेच कैदी सुटून आल्यानंतर रोजगार मिलवून देण्यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य सुरू आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळेे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता चौक वावर्ले येथील महाराष्ट्र शांतीदुत परिवाराचे सचिव तथा कांनसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात फाऊंडेशनच्या वतीने विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. कानसा वारणा फाऊंडेशनच्या वतीने कार्यकर्त्यांकडून राज्यभर मास्क, सॅनिटायजर, गोरगरिबांना मदत म्हणून धान्य व किराणा सामानाचे वाटप सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील विरळे व आजूबाजूच्या पंधरा गावांमध्ये सर्व ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप त्याचबरोबर मोलमजुरी करणार्‍या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व रेशनिंग सामान गोंडोली, माळेवाडी, जांबुर, कांडवण, थावडे, सोंडोली, शित्तुर, उखळू आदी गावांमध्ये वाटप करण्यात आले. गोरगरीब जनतेला किराणा सामान देवून कानसा वारणा फाऊंडेशनने दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने संस्थापक दिपक पाटील यांचे आभार मानले जात आहेत.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp