Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / रिलायन्स फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रिलायन्स फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात गोरगरीब कुटुंबांसाठी कैरे येथील माजी उपसरपंच सुरेश पाटील व माजी सरपंच अविनाश पाटील यांनी रिलायन्स पाताळगंगा व्यवस्थापनाशी चर्चा करून परिसरातील गरजू नागरिकांना व आदिवासी बांधवांना रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या वेळी कैरे पाताळगंगा विभागातील आदिवासी वाड्या व गरजू, गोरगरिबांना जिल्हा परिषद सदस्या पद्माताई पाटील, पाताळगंगा रिलायन्स इंडस्ट्रीजचे एचआर हेड थॉमस इशो, कॉर्पोरेट अफेअर्स सीनियर मॅनेजर संतोष विचारे, रामदास भांड व अरुण माने (रिलायन्स व्यवस्थापन पदाधिकारी), ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील, मारुती पाटील, गणेश पाटील, सचिन पाटील, संकेत पाटील, निकेतन मोधले, प्रमोद पाटील आदींच्या हस्ते धान्यासह किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. या वेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना कोरोनाविषयक माहिती देऊन कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले. मदत वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp