Saturday , October 16 2021
Breaking News

‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात  त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणार्‍या मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणार्‍या सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ राहण्याची व्यवस्था करावी या मागणीचा आम्ही पुनरुच्चार करतो.

वैद्यकिय सेवा देणारे कर्मचारी अथवा सर्वच अत्यावश्यक सेवा देणार्‍यांचा आम्हाला पूर्ण आदर आहे. त्यांच्या परिवारजनांचे आरोग्य सुदृढ रहावे व मुंबईतील रोगाच्या फैलावाचे प्रमाण पहाता अशा कर्मचार्‍यांना बाधा पोहचून तिची अन्य लोकांना लागण होऊ नये म्हणूनच यासाठी आम्ही या मागणीच्या बाबतीत आग्रही आहोत. या मागणीच्या बाबतीत तातडीने विचार न झाल्यास पनचेल महापालिका क्षेत्रात अमर्याद करण्यासाठी लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, पनवेलकरांची लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुनही केवळ रोज पनवेल बाहेर जाणार्‍यांमुळे ही वेळ येणार असेल तर पनवेल क्षेत्रातील सर्वच सेवा बंद ठेवा.

म्हणूनच या मागणीचा विचार न केल्यास पनवेल महानगरपालिका हद्दीतील वैद्यकिय सेवा वगळून सरळ सेवा 4 मेपासून बेमुदत बंद ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुढाकार घेईल याची कृपया नोंद घ्यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp