Sunday , July 25 2021
Breaking News

‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी-कर्मचार्‍यांचे कामाच्या ठिकाणी जवल राहणेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद अमित जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले आहे. 

अमित जाधव यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की पनवेल तालुक्यातील माझ्या रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायतीमध्ये बांधकाम व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात इमारती बांधून त्या वसाहती नजीक पनवेल रेल्वे स्टेशन असल्याने मुंबई व त्या नजीकच्या शहरामध्ये नोकरी, व्यवसायासाठी जाणे येणे सोईचे होत असल्याने वरील तीन ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी, कर्मचारी राहत आहेत. या संदर्भात ग्रामसेवक विचुंबे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे 25 एप्रिलला लेखी स्वरूपात कळविले आहे.

सध्या कोरोनाच्या (कोविड19) प्रार्दुभाव झाल्याने राज्यात लॉकडाऊन नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. अशातच माझ्या मतदार संघातील पालीदेवदमध्ये एक व विचुंवे या गावात दोन कोरोना (कोविड 19)चे रूग्ण सापडले आहेत व सदरचे तिन्ही रूग्ण हे मुंबई ये-जा करणारे होते, अशा स्थितीतील या परिसरात राहणारे अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी व खाजगी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी हे त्याच्या कामाच्या ठिकाणी आपल्या राहत्या घरून रोज ये-जा करत असल्याने त्याचे कुटूंब व या परिसरातील ग्रामस्थांना कोरोनाची लागण होण्याचे नाकारता येत नाही. त्याच वेळीस आला घालण्यासाठी या तीन ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी अस्थापनामधील अधिकारी, कर्मचार्‍यांची राहणेची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणी केल्यास त्याचे कुटुंब व या परिसरात राहणारे नागरिक यांना कोरोना संकमणापासून पराभूत करून या परिसरातील परिस्थिती लवकर पुर्व पदावर येईल अशी माझी व या परिसरात राहणार्‍या नागरिकांची धारणा आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करून सर्व सबंधीतांची व्यवस्था त्याच्या कामाच्या ठिकाणी जवळ करण्यास यावी, अशी मागणी अमित जाधव यांनी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पनवेल उपविभाग कार्यालय उपविभागीय अधिकारी, पनवेलचे तहसिलदार, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिली आहे.

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp