Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल तालुक्यात दोन रुग्णांचा मृत्यू

पनवेल तालुक्यात दोन रुग्णांचा मृत्यू

25  नवे रुग्ण; जिल्ह्याचा आकडा सहाशेपार

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी (दि. 21) 12 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी देवद (सुकापूर)  येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कसालखंड दोन, चिखले, अष्टा, पळस्पे, वहाळ, उलवे आणि विचुंबे येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. महापालिका क्षेत्रात कामोठे आणि खारघर प्रत्येकी चार,  कळंबोली तीन आणि नवीन पनवेल दोन असे 13 नवीन रुग्ण आढळले असून 16 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी दोन व्यक्तींचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील चार आणि कर्जत, खालापूर, माणगाव आणि महाड तालुक्यातील प्रत्येकी एक नवा रुग्ण मिळून रायगड जिल्ह्याचा एकूण आकडा 623वर पोहचला आहे.    
पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी कळंबोली येथील एक्स सर्व्हिसमॅन सोसायटीतील 65 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांना यापूर्वी पक्षघाताचा झटका आला होता. कामोठे येथील सेक्टर 7मधील श्रीराम आर्केडमधील 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कामोठे येथे चार नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी एक नर्स, तर दोन कामोठे येथे हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत. सेक्टर 18मधील  एका 13 वर्षीय मुलाला कोरोना झाला आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 13 ए टाइपमधील यापूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीबरोबर काम करणार्‍या आणि सेक्टर 8मधील मुंबई महापालिकेत काम करणार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे.
खारघरमधील पोलिसाच्या घरातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून, त्यांना पूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. सेक्टर 8मधील एक नर्स आणि सेक्टर 18 गुडविल गार्डनमधील 13 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली येथील सेक्टर 3 ई मधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्या कुटुंबप्रमुखाचा रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या 2115 टेस्ट झाल्या असून 318 रुग्ण आढळले. त्यापैकी 167 जणांनी कोरोनावर मात केली असून 69 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत, तर 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी पनवेल ग्रामीणमध्ये 12 नवीन रुग्ण आढळले. त्यामध्ये  देवद (सुकापूर) येथील राम समर्थ सदनमधील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबप्रमुखाला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. कसालखंड दोन,  वहाळ आणि  अष्टा येथील रुग्णांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा.  विचुंबे येथे तेजस निवासमधील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय चिखले, उलवे आणि पळस्पे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात 329 टेस्ट घेण्यात आल्या असून 15 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 128 रुग्ण आढळले. त्यापैकी 53 जणांनी कोरोनावर मात केली असून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 72 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp