Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / भेंडखळच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजरला कोरोनाची लागण

भेंडखळच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजरला कोरोनाची लागण

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोप्रोली-नवघर महामार्गावरील भेंडखळ येथील जीडीएल गोदामांजवळील द्रोणागिरी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने तेथे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या खळबळ निर्माण झाली होती. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे हा  द्रोणागिरी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता.

पनवेल येथून भेंडखळ येथील या द्रोणागिरी पेट्रोल पंपावर ये-करून काम करीत असलेला मॅनेजर आगोदरच कुठेतरी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. तर मागील 12 दिवसांपूर्वी या पंपातील मॅनेजर गोदमातील कलमार आणि फोरक्लिप या मशनरींसाठी लागणार्‍या डिझेल डिलिव्हरी करण्यासाठी उरण तालुक्यातील बांधपाडा-खोपटे येथील अमेया लॉजिस्टिक येथे आले असता, गोदामाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी हिटिंग मशीनच्या साहाय्याने तपासणी केली असता, 106 एवढा आकडा आल्याने तेथील संबंधितांनी कोरोना तपासणीसाठी जाण्याचा

सल्ला दिला.

मात्र हे मॅनेजर महोदय आणखी बर्‍याच ठिकाणी कामे उरकत सायंकाळी त्यांच्या पनवेल येथील घरी गेल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी गेले पुन्हा मागील 12 दिवसांपासून ते भेंडखळ येथील पेट्रोल पंपावर आलेच नाहीत. मात्र त्यांच्या कोरोना तपासणीचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्याने पेट्रोल पंपावरील कामगारांमध्ये घबराट पसरली आहे.

त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले चार कर्मचारी यांची काल बोकडवीरा येथील कोरोना तपासणी सेंटर येथे कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय या पेट्रोल पंपावर उरण तालुक्यातील आवरे, कुंडेगाव, वशेणी, बोकडविरा व पनवेल तालुक्यातील दिघाटी या गावांतील कामगार काम करीत असून,

त्या सर्व 47 कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर पंपातील कोरोना बाधित मॅनेजर पनवेल येथील रहिवासी असल्याने त्यांची नोंद पनवेल येथे झाली आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp