Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / अलिबागमध्ये राज्य सरकारविरोधात निवेदन

अलिबागमध्ये राज्य सरकारविरोधात निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सराकर अपयशी ठरले आहे. राज्य शासनाच्या या नाकर्तेपणाचा दक्षिण रायगड जिल्हा भाजपातर्फे शुक्रवारी (दि. 22) निषेध करण्यात आला. भाजपच्या अलिबाग येथील कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रनिधिमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सादर केले. या वेळी दक्षिण रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा संघटक सतीश धारप, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, वैकुंठ पाटील, जिल्हा चिटणीस मिलींद पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील आर्थिक पॅकेज त्वरित घोषित करावे.  रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरमालक, बाराबलुतेदार यांना आर्थिक मदत करावी. आधारभूत किमतीवर धान्य खरेदी सुरू करावी. संपूर्ण कर्जमाफी त्वरीत लागू करावी. शाळेची फी रद्द करावी. शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य द्यावे. विद्यार्थी , महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवासाची सुविधा द्यावी. खाजगी रूग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळावेत. शेतकर्‍यांना बी-बियाणे मोफत द्यावे. तीन महिन्यांचे घरभाडे माफ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन साहित्यिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन साहित्यिक उपक्रम हा नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समुहातर्फे आयोजित केलेल्या साहित्य संवाद अंतर्गत अभिवाचन या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम होते. या अभिवाचन उपक्रमात मुरूडच्या दिपाली दिवेकर, महाडचे राकेश मेथा, अलिबागच्या अनुया आपटे, इंदापूरचे प्रा. भरत जोशी, उरणच्या प्रांजल कडू यांनी सहभाग घेतला. या वेळी साहित्याचा मधुघट समुहाचे गझलकार डॉ. रघुनाथ पोवार, अजित शेडगे, हेमंत बारटक्के यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत बारटक्के यांनी केले, तर आभार संध्या दिवेकर यांनी मानले. कोमसापचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, उत्तर रायगडचे अध्यक्ष डॉ. सुधाकर चव्हाण, अ‍ॅड. गोपाळ शेळके यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp