Saturday , January 23 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / नागरिकांचे वीज बील माफ करावे; नगरसेविका वृषाली वाघमारे यांची महावितरणकडे मागणी

नागरिकांचे वीज बील माफ करावे; नगरसेविका वृषाली वाघमारे यांची महावितरणकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये नागरिक घरातच बसून आहेत. परिणामी घरातील विद्युत उपकरणांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे येणारे भरमसाठ बील भरणे हे नागरिकांना परवडणारे नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळे पनवेलमधील जनतेचे तीन महिन्यांचे वीजेचे बील माफ करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी पनवेल महावितरणाकडे पत्राद्वारे

केली आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे,  आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी ही वाढविलेला असून सर्व जनतेला घरी रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग हे बंद असल्यामुळे सर्व जनतेला त्याची झळ लागत आहे. त्याबरोब घरी राहील्यामुळे व उन्हाळा असल्यामुळे घरातील पंखे, टी.व्ही., एसी चालू असते व वीजेचा अधिक वापर होतो. त्यामुळे लाईट बिलात वाढ होत आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर जाऊन रिडिंग न घेल्याने वाढीव बील देण्यात आलेले आहे. परंतु आताची परिस्थितीर लक्षात घेता एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे बील माफ करण्यात यावे, अशी मागणी पनवेलच्या महावितरणकडे केली आहे.

Check Also

देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!

सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी …

Leave a Reply

Whatsapp