Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कारागृहातून पळालेल्या दुसर्या आरोपीलाही बेड्या

कारागृहातून पळालेल्या दुसर्या आरोपीलाही बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या  दुसर्‍या आरोपीला  पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्‍या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली. अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.  बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले दोन कैदी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अलिबागच्या कारागृहातून पळाले. कारागृहाच्या भिंतीवरून या दोघांनी उडी मारली. यातील एक जायबंदी झाल्याने पोलीसांच्या तावडीत सापडला. तर दुसरा पळून गेला. रात्री उशीरा त्याला कोलाडजवळ पोलिसांनी अटक केली.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp