Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / भाजप युवा मोर्चा पुन्हा रक्त तुटवडा भरून काढणार

भाजप युवा मोर्चा पुन्हा रक्त तुटवडा भरून काढणार

जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
रक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरून काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली.
कोविड-19 महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. विशेषकरून थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. भाजपच्या युवकांची फळी विविध समाजोपयोगी उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असते. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात रक्तदान करून विशेषत: टाटा कॅन्सर रुग्णालय रक्तपेढी, एमजीएम व रोटरी, खांदा कॉलनी येथील रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरवठा केला. त्याचबरोबर गरजूंना अन्नधान्य वाटप, जेवण वाटप, प्रवासी पास काढून देण्यासाठी मदत आदी उपक्रमांत हिरीरिने सहभाग नोंदवला. ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा, आकर्षक मास्क तयार करणे, घरात राहूनच फोटोग्राफी आदींसारख्या अभिनव स्पर्धाही संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जात आहेत. त्यात जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढावा यासाठीही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
सध्या सगळीकडे रक्ताचा तुटवडा असल्याने युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत येत्या 10 दिवसांत एक हजार रक्त पिशव्यांचा संकल्प केला आहे. यासाठी 24 मे ते 2 जूनदरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळत रक्तदानाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात नागरिकही सहभाग नोंदवू शकतात.
रक्ताची गरज अथवा रक्तदानासाठी इच्छुक असल्यास पनवेल शहर-रोहित जगताप (8691930709), पनवेल ग्रामीण-आनंद ढवळे (9773947777), कामोठे-हर्षवर्धन पाटील (7715048181), कळंबोली-अमर ठाकूर (8767171010), खारघर-विनोद घरत (9821699090), कर्जत-प्रमोद पाटील (9850057378), खालापूर-प्रसाद पाटील (9273270094), खोपोली-अजय इंगूळकर (9545478666), उरण-शेखर पाटील (9082553954) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नेतकर यांनी केले आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp