Saturday , June 6 2020
Home / महत्वाच्या बातम्या / अलिबागमध्ये साकारतेय कोविड केअर सेंटर

अलिबागमध्ये साकारतेय कोविड केअर सेंटर

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन अलिबागजवळच्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटरची उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास तुषार, सारंग, तिनवीरा येथील शासकिय विश्रामगृहांचे रूपांतरही केअर सेंटरमध्ये करण्याची चाचपणी सुरू आहे.
सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर पनवेल येथील कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील हॉस्टेलमध्ये 40 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सुविधाही दिल्या जाणार आहेत. यामुळे रुग्णांना जवळच उपचार घेणे शक्य होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची तुषार आणि सारंग विश्रामगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

Check Also

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे …

Leave a Reply

Whatsapp