Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / नुकसानग्रस्तांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी -आमदार महेश बालदी

नुकसानग्रस्तांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी -आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त
कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळात उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या घरांचे आणि शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून राज्य शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना भरीव मदत करावी, तसेच अनेक ठिकाणी खंडित झालेला विद्युत पुरवठा पुर्वता सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी केली आहे.
चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांत घरांचे पत्रे, कौले उडून, झाडे कोसळून, तसेच शेतकर्‍यांच्या आंबा पिकांचेही नुकसान झाले आहे. उरण शहर, चाणजे, मोरा, केगाव, नागाव, आवरे, कोप्रोली, चिरनेर, वेश्वी, दिघोडे, गव्हाण, उलवे, वशेणी, केळवणेसह इतर अनेक गावांची आणि कर्नाळा, चौक, रसायनी परिसरातील गावांची उरणचे आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. नुकसानग्रस्तांना राज्य शासनाने सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp