Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला पनवेल परिसरातील आढावा

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला पनवेल परिसरातील आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसरातील ठिकाणांची पाहणी केली व आढावा घेतला.
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड जिल्ह्यात धडक दिली. या वादळामुळे पनवेलमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तेथील रस्ते बंद झाले होते, तर विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 19मध्ये अधिकार्‍यांसह पाहणी करून आढवा घेतला.
या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, एमएससीबीचे अधिकारी श्री. मोरे, प्रभाग क्रमांक 19अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, केदार भगत, चिन्मय समेळ, हरिश्चंद्र भगत, तुषार कर्पे, अजिंक्य जाधव उपस्थित होते.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp