Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / रोहा तालुक्यात नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे

रोहा तालुक्यात नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे

रोहे ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात होत्याचे नव्हते झाले. या चक्रीवादळाने तालुक्यातील नागरिकांना हादरवून सोडले. रोहा शहरासह ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे महसूल विभागाने अन्य विभागांच्या सहकार्याने युद्धपातळीवर सुरू केले आहेत.

रोहा तालुक्यात 89 गावांतून 8000 नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले असून, उर्वरित नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.

रोहा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले होते. अनेकांचे संसार या चक्रीवादळात उघड्यावर पडले आहेत. शहरासह ग्रामीण भागात घरांवरील पत्रे आणि कौले उडाली, तर काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने घरांचे नुकसान आणि मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय तसेच रोजगार बुडाला, तर निसर्ग चक्रीवादळामुळे घरावरील छप्परही गेले. त्यामुळे अशा वेळी आता करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp