Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / चिंताजनक! रायगडात तब्बल 353 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

चिंताजनक! रायगडात तब्बल 353 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाच्या तब्बल 353 रुग्णांची नोंद झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 186, पनवेल ग्रामीणमधील 47, रोहा तालुक्यातील 33, अलिबाग तालुक्यातील 19, महाड तालुक्यातील 14, उरण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी 13, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील सहा, कर्जत तालुक्यातील चार, खालापूर तालुक्यातील तीन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे, मृत व्यक्ती पनवेल, पेण, अलिबाग व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक अशा आहेत. दुसरीकडे दिवसभरात 81 रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4812वर पोहोचला असून, मृतांची संख्या 144 इतकी झाली आहे.

Check Also

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. …

Leave a Reply

Whatsapp