Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / विक्रांत पाटील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी

विक्रांत पाटील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या राज्यातील कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) केली. यामध्ये 12 उपाध्यक्ष, पाच महामंत्री यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार आशिष शेलार व माधुरी मिसाळ विधानसभेत मुख्य प्रतोद असतील. दरम्यान, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील नेत्या उमा खापरे, तर युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ, माधवी नाईक, प्रसाद लाड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर यांचा समावेश आहे. सुजितसिंह पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय हे महामंत्री असणार आहेत, तर मुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अन्य पदाधिकार्‍यांनाही विविध पदांवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे हे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहतील, तर पंकजा मुंडे यांनी राज्यापेक्षा केंद्रात लक्ष घालावे ही केंद्राची इच्छा आहे.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Check Also

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. …

Leave a Reply

Whatsapp