Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी (दि. 3) पहाटे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. 1974मध्ये गीता मेरा नाम या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत तसेच त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या बॉलीवूडपासून दूर होत्या.

Check Also

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. …

Leave a Reply

Whatsapp