Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / नेरळमध्ये डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण

नेरळमध्ये डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण

कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथील डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याआधी गेल्याच महिन्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
कोरोनाग्रस्त तरुणाला तपासल्याने नेरळ खांडा येथील खासगी डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. 13 जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या 45 वर्षीय खासगी डॉक्टरला राहत्या घरातच विलगीकरण करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरची पत्नी आणि मुलगी हेही 16 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर या डॉक्टरला पुन्हा कोरोना विषाणूची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:सह पत्नीचा स्वॅब 30 जून रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दिला होता. या दाम्पत्याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे.

Check Also

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. …

Leave a Reply

Whatsapp