Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी

कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात कोरोनाचे थैमान कायम आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे, तर दुसरीकडे कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 31) सकाळी संपलेल्या 24 तासांत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 55 हजार 79 नवीन रुग्ण आढळून आले, तर 779 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 38 हजार 871 इतकी झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 35 हजार 747 इतकी झाली आहे.

जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताने इटलीला मागे टाकले. इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत 35 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत पहिले चार देश अनुक्रमे अमेरिका (एक लाख 52 हजार 70), ब्राझील (91 हजार 263), ब्रिटन (46 हजार 84) आणि मेक्सिको (46 हजार) आहेत.

एका महिन्यात मोठी वाढ

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत देशात पाच लाख 66 हजार 840 इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली. या महिन्यात जवळपास 10 लाख नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 18 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp