Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 338 नवे पॉझिटिव्ह

रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 338 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाग्रस्त 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 338 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण तीन, उरण व खालापूर प्रत्येकी दोन आणि अलिबाग, श्रीवर्धन व पोलादपूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 121, ग्रामीण 33) 154, पेण 40, खालापूर 35, अलिबाग 27, कर्जत 18, उरण व माणगाव प्रत्येकी 17, रोहा 13, महाड नऊ, सुधागड तीन, म्हसळा दोन, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 506 रुग्ण बरे झाले. नव्या रुणांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15201 आणि मृतांची संख्या 422 झाली आहे. आतापर्यंत 11,594 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3185 सक्रिय रुग्ण आहेत.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp