Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!

अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!

माणगाव ः प्रतिनिधी

तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहिणारे व रशियाच्या लेनिन चौकात शिवरायांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माणगावात मातंग समाजाच्या वतीने माणगाव एसटी स्टँडमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मातंग समाजाचे नेते विश्वनाथ तालीमकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी आगार व्यवस्थापक चेतन देवधर, अधीक्षक जगदिश भोई, वाहतूक नियंत्रक अशोक जाधव, धर्मेंद्र जाधव, विकास खाडे, सौरभ मोरे, मंगेश पाटेकर, मातंग समाजाचे कार्यकर्ते वसंत जाधव, संतोष माने, राणोजी लोणके, विजय दिवाळे आदी उपस्थित होते.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp