Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / बकरी ईद साधेपणाने साजरी

बकरी ईद साधेपणाने साजरी

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात कोरोनाच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदबरोबरच बकरी ईदही शनिवारी (दि. 1) साधेपणाने साजरी केली. मशिदीत केवळ मौलाना व अन्य तीन जणांनीच नमाज अदा केली. अन्य मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा केली.

तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून  ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांची त्यांच्या घरी भेट घेऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  माणगाव, नाणोरे, मोर्बा, लोणशी, निजामपूर, साई, मांजरवणे, गोरेगाव, दहिवली कोंड, दहिवली, वडवली, तारणा, नांदवी, पूरार, वणी, टेमपाले, लाखपाले आदी मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती असणार्‍या सर्वच गावांतून बकरी ईद साधेपणाने आणि शांततेत साजरी करण्यात आली.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp